जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांची १५१ वी पुण्यतिथी
मराठी-इंग्लिश शब्दकोशाचे संपादक जेम्स थॉमस मोल्सवर्थ फोटो किंवा छायाचित्र उपलब्ध नाही. पण त्यांच्या पूर्वजांच्या तैलचित्राच्या आधारावर मुंबई येथील टाइम्स ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त वार्ताहर आणि आता जगविख्यात चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी काढलेलं कल्पना चित्र
मराठी-इंग्लिश शब्दकोशाचे संपादक जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांची १५१ वी पुण्यतिथी आज १३ जुलै २०२२ रोजी. मराठी भाषेवर थोर उपकार करणाऱ्या या महान शब्दकोशकारांला आपण आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे या भावनेने गेल्यावर्षी याच दिवशी पुण्याच्या विश्वकर्मा विद्यापीठाच्या वतीने एक छोटी पुस्तिका आम्ही प्रकाशित केली होती, ही पुस्तिका http://vuccd.com/james-thomas-molesworth-marathi-english-dictionary-project/ या लिंक वर कोणालाही उपलब्ध आहे.
शब्कोशाचे काम अजूनही चालू आहे. त्या विषयी आजच्या पुण्यतिथीला जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचे पुण्यस्मरण, वर्ष १८५७ मध्ये शिळा प्रेस वर केलेलं काम ऑफसेट प्रिंटिंग च्या माध्यमातून १९७५ मध्ये शुभदा सारस्वत प्रकाशनचे श्री शरद गोगटे यांनी चालू ठेवले. त्याच्याही सहा-सात आवृत्त्या निघाल्या. यानंतर इंटरनेट आणि युनिकोड चा वापर करून देवनागरी लिपीमध्ये हा शब्दकोश पुन्हा सिद्ध करता आला. आता तर राष्ट्रीय ग्रंथालय आणि विविध संस्थांनी आर्थिक मदत केल्यामुळे द डिजिटल डिक्शनरीज ऑफ साऊथ एशिया प्रोग्राम यांच्या माध्यमातून ते काम अजूनही पुढे चालू ठेवता आले आहे.
द डिजिटल डिक्शनरी ऑफ साऊथ एशिया
या निमित्ताने द डिजिटल डिक्शनरी ऑफ साऊथ एशिया (डी डी एस ए) याविषयी थोडी नोंद.
हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून उभा राहतो आहे. सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाचे दस्तावेज टिकविले पाहिजे या भावनेने हे काम उभे राहते आहे. दक्षिण आशिया मधील सर्व भाषांच्या शब्दकोशांची जपणूक करण्यासाठी आणि ते कोणालाही विनामूल्य उपलब्ध व्हावे हा प्रयत्न या प्रकल्पात केला जात आहे. डी डी एस ए या संस्थेने अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशातील शब्दकोशांची भांडारे युनिकोड चा आणि इंटरनेटचा वापर करून सर्वांना विनामूल्य मुक्तहस्ते मिळू शकेल अशी व्यवस्था केलेली आहे. सेंटर फॉर रिसर्च लायब्ररीज च्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहिला आहे आहे यासाठी अनेक संस्थांचे हातभार लागले आहेत. अमेरिकेच्या शिक्षण विभागाने टेक्नॉलॉजिकल इनोवेशन अंड कोऑपरेशन फॉर फोरिन इंफॉर्मेशन एक्स्चेंज या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प उभा राहिला आहे. The Andrew Mellon Foundation, University of Chicago, नवी दिल्ली, एशिया सोसायटी आदी संस्थांनी या प्रकल्पाला हातभार लावलेला आहे. त्याचा तपशील या लिंकवर उपलब्द्ध आहे. https://dsal.uchicago.edu/institutions.html
सेंटर फॉर लायब्ररीज, युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो, कोलंबिया युनिव्हर्सिटी, एशिया सोसायटी, असोसिएशन फोर अशियन स्टडीज, कौन्सिल ऑफ अमेरिकन रिसर्च सेंटर’ लायब्ररी ऑफ काँग्रेस, ट्रँगल साऊथ एशिया कन्सोर्तियम, युनिव्हर्सिटी ऑफ मिंनेसोटा, उनिव्हसिटी ऑफ वाशिंग्टन, उर्दू रिसर्च लायब्ररी कन्सोर्तियम, रोजा पुठीया रिसर्च लायब्ररी, लायब्ररी ऑफ काँग्रेस फिल्ड ऑफिस, नवी दिल्ली, मदन पुरस्कार पुस्तकालय,आदिकल लायब्ररी, सुंदर आलया विज्ञान केंद्रम, तमिल नाडू स्टेट, ऑस्ट्रेलिया, कर्टीन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी
क्रिएटिव कॉमन्स लायसन्स या संस्थेच्या वतीनं हा भव्य प्रकल्प राबविला जातो आहे . क्रिएटिव कॉमन्स लायसन्स या द्वारे व्यक्तिगत आणि सामुहिक रित्या कोणालाही वापरण्याची मुभा या लायसन्स द्वारे मिळते. याचा अर्थ शब्दकोशाच्या बाबतीत असा कि कोणालाही ही ऑनलाईन डिक्शनरी विनामूल्य वापरण्याची परवानगी आहे. ही ऑनलाईन सोय या लिंकवर https://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/ त्यामुळे तुम्ही देखील मोल्सवर्थ मराठी-इंग्रजी शब्दकोशाचा वापर करण्यासाठी गुगल प्ले वरील अँड्रॉइड एप्लीकेशन वापरू शकता. एप्पल ॲप स्टोअर मधील मराठी आणि इंग्रजी आय एस, आयपॅड आणि आयफोन वापरू शकता.
सुमारे साठ हजार शब्दांपैकी असणारा कोणताही शब्द एकदा शोधून पाहा. या कोशाची मांडणी अतिशय सुलभ पद्धतीने केलेली असल्यामुळे तुम्ही कोणताही शब्द आणि त्याचा इंगजी अर्थ सहजगत्या आणि जलद गतीने शोधू शकता. त्यासाठी मराठी शोधण्यासाठी युनिकोड फॉण्ट चा वापर करून शब्द शोधू शकता. त्या शब्दाचा अर्थ इंग्रजीतून पाहू शकता. असा शब्द कोणत्या पानावर आहे ते तुम्हाला चटकन कळू शकते आणि त्यासाठी मराठी आणि रोमन लिपीचा चा वापर करू शकता.
या सर्व सुविधा साठी आपण जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचे ऋणी असले पाहिजे.
प्रा डॉ किरण ठाकूर
drkiranthakur@gmail.com
Comments
Post a Comment