वानप्रस्थाश्रम 

आजच्या काळात वानप्रस्थाश्रम ही संकल्पना अमलात आणणे शक्य आहे का? वयाच्या पन्नाशी मध्ये शेती नव्याने शिकणे, सेंद्रिय शेतीचा-निसर्ग शेतीचा मल्टी लेवल मल्टी क्रॉपिंग प्रयोग करणे, तो यशस्वी करून दाखवणे शक्य आहे का?
या प्रश्नाची प्रश्नांची उत्तरे “हो” आहेत,
 हे मध्य प्रदेश मधील नर्मदा खोऱ्यात एका खेड्यात सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्याने करून दाखवले आहे.
 ही कथा आहे आडवाटेला असलेल्या खरगोन जिल्ह्याच्या मोगावा या गावच्या यज्ञ दत्त शर्मा आणि सौभाग्यवती आराधना शर्मा या दाम्पत्याची. नर्मदा मैया च्या खोऱ्यात त्यांचं हे मोगावा गाव नदीपात्रापासून जवळच आहे. नर्मदा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना नव्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले.
 त्या क्षेत्रात लेपा पुनर्वास या नवीन गावाला लागून मोगावा हे गाव आहे. तसे हे कुटुंब मूळचे शेतकरीच. पण पिताजींनी निमाड परिसरात सुरू केलेल्या प्राथमिक/माध्यमिक शाळेचा विस्तार यांनी वाढवला. शेती मागे पडली. शर्माजींची पन्नाशी उलटली तेव्हा त्यांनी निवृत्ती घेऊन आपल्या गावच्या शेतीवर प्रयोग करायचे ठरवले. एकुलत्या एक कन्येच्या - श्रुतीच्या -- पत्रकारितेच्या पदवी परीक्षेनंतर तिने मुंबईला मीडिया फोटोग्राफी सुरु केली . आता शर्मा दाम्पत्याच्या कौटम्बिक जबाबदाऱ्या कमी झाल्या. तेव्हा या दोघांनी शेती करायचे ठरवले. जमीन त्यांचीच परंतु उपेक्षित राहिलेली. एक एकर म्हणजे काही फार मोठी भव्य शेतजुमला नाही परंतु त्यांनी कंबर कसून काळ्या आईची सेवा करायची ठरवले. सेंद्रिय शेतीची आणि निसर्ग शेतीची पूर्ण माहिती करून घेतली. शेतावरच वास्तव्य करायचे ठरवले. आपल्या कल्पनेनुसार जुन्या नव्याची सांगड घालून सोयी सुविधा असलेले घर बांधले. छान भरपूर खेळती हवा आणि सूर्यप्रकाश असलेले घर बांधले. एसीची गरजच राहणार नाही अशी वास्तू उभी राहिली. गेल्या दोन वर्षात या दांपत्याने एक आदर्श शेत उभे केले आहे. अनेकांचा सल्ला त्यांनी निश्चित घेतला. सुभाष पाळेकर यांच्यासारख्याचे मार्गदर्शन त्यांनी घेतले आहे. पण भारतातल्या वेगवेगळ्या मातीतले पिकांचे नमुने, त्याच्या बिया आणि कलमे गोळा करून शेत उभे केले आहे. रासायनिक खताचा कणभर ही उपयोग न करता पिके लावता येतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. भाजीपाला, फळ फळावळ, फुलं, कंदमूळ असं सर्व काही त्यांनी लावून दाखवलं आहे. जमिनीचा सुयोग्य वापर कसा करता येईल याचा विचार त्यांनी केला आहे.
आत्मनिर्भर किसान, आत्म निर्भर भारत हे त्यांचे मार्गदर्शक घोष वाक्य बनले आहे. वानप्रस्थाश्रम म्हणजे उरलेले आयुष्य आरामात काढायचे, पेन्शन वर दिवस कसेबसे जगायचे किंवा मनसोक्त धार्मिक/अध्यात्मिक पर्यटन करायचे या अशा संकल्पना त्यांनी मोडीत काढल्या आहेत.
या ‘ उतार वयात’ देखील आपण नवनवीन प्रयोग करू शकतो, आपले उरलेले आयुष्य सत्कारणी लावू शकतो. आपल्याला जे येते, जे आपण शिकलो ते इतरांना मुक्त हस्ते दिले पाहिजे याच्यावर आपला विश्वास आहे. कुठलाही अभिनिवेश न ठेवता श्री व सौ शर्मा सहजपणे हे करून दाखवत आहेत. त्यांनी लावलेल्या रोपांची संख्या आणि वृक्षांचे प्रकार यांचा तपशील ढोबळ मानाने ते असा सांगतात: सागवान, अनेक प्रकारचे स्थानिक आंबे, चिकू, लिंबू , सिताफळ, रामफळ, अनार, पेरू , बोर, सहा/ सात प्रकारची वांगी, मिरची, कांदा, लसूण, आलं, ऑल-स्पाइस, तमालपत्र, वावडिंग, काळी मिरी, वेगवेगळ्या रंगाच्या मिरच्या, मेथी , सूर्यफूल, शेवगा. अतिशय चविष्ट पपई, त्याच्या अनेक व्हरायटी, मोसंबी, भोपळा, कमल कुंज, मेथी, टोमॅटो, आवळा, बेहडा अशा औषधी वनस्पती, झेंडू, गुलाब, मोगरा, जाई, जुई अशा फुलांचे ताटवे .. आणखी किती सांगू!
 अगदी अलीकडे अलीकडे पर्यंत ओसाड असलेले एक एकराचे हे माळरान आता घनदाट जंगल झालं आहे. जपानच्या मियावकी फॉरेस्ट ची ही प्रतिकृती आहे असे क्षणभर वाटेल. ते मियावकी तंत्र त्यांनी वापरलं का? नाही.
 ही पूर्णपणे स्वदेशी संकल्पना या जोडप्याने विकसित केली. फक्त शेणखतावर पोसणारी ही वनस्पती इथे दिसते. ही वृक्षसंपदा जोमाने झपाट्याने येथे बहरते आहे. पाण्याची उपलब्धता हा प्रश्न येथे नाही. तरीसुद्धा फक्त ड्रिप इरिगेशनचा प्रभावी वापर करून या दांपत्याने हे वानप्रस्थाश्रमातले आपले वन उभारले आहे . त्या त्या ऋतूत फुलणारी सीझनल फुले फळे अशा पद्धतीने लँडस्केपिंग करून लावली आहेत की फळाफुलांचा सुगंध आहेत सर्वत्र दरवळेल.
निमाड अभ्युदय रुरल मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन ( नर्मदा ) या संस्थेच्या प्रांगणापर्यंत जाण्याची वाट या घरापासून जवळच आहे या संस्थेच्या प्रांगणात सकाळपासून संध्याकाळी उशिरापर्यंत चालू असलेल्या विविध कामामध्ये जमेल तसा जमेल तितका सहभाग या दांपत्याचा असतो. अनेक गोष्टी तेथे शिकायला आणि शिकवायला मिळतात हा आनंदाचा भाग असतो अस शर्माजी पती-पत्नीचं म्हणणं.
 "या तुमच्या मेहनतीचं_ खरं म्हणजे उपदव्यापाचं-- फलित काय? काय आहे याचा कॉस्ट बेनिफिट रेशो " असे मध्यमवर्गीय , पांढरपेशी प्रश्न उपस्थित होतातच. “शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. जो त्यात पडतो तो बुडतोच. उगीच नाही इतके शेतकरी आत्महत्या करत”
असे मुद्दे महाराष्ट्रातून येणारे माझ्या सारखे उपस्थित करतात. यावर यज्ञदत्त शर्माजी यांचं काय म्हणणं? “आमचं हे वानप्रस्थाश्रमातील काम आहे. फायदा तोटा याचा विचार केलेला नाही. मिळाले ते आयुष्य सुखासमाधानात जावं. जमेल तेवढी मदत इतरांना करावी. शिकता येईल तेवढे शिकावं. आपण शिकलेलं इतरांना शिकवावं एवढीच आमची कल्पना आहे. आम्ही आत्ता पन्नाशीतील आहोत’ अजून औपचारिक निवृत्तीचे वय देखील गाठायचे राहिले आहे. शेतीचे म्हणाल तर आत्ता कुठे दोन वर्ष होत आहेत. हिशोब ठिशोब त्यानंतरच होतील. तेव्हाचं तेव्हा बघू. साऱ्या राष्ट्राच्या किंवा खरे म्हणजे वैश्विक समस्या आम्हीच हाताळल्या पाहिजेत असे थोडेच आहे. आम्हाला जमेल तेवढे आम्ही करू. चुकलेमाकले तर शहाण्यांचे ऐकून दुरुस्त करू.” 

 शलाका ठाकूर 
 फ्लॅट क्र ३, इंद्रायणी पत्रकारनगर, पुणे ४`११०१६ 
drkiranthakur@gmail.com 

 -- 

 Vanaprasthashram of a Teacher Couple 

Is it possible for a Hindu couple to enter into Vanaprasthashram, leaving aside the responsibilities of the grahasthashram, learn organic farming/natural farming, and successfully adopt multi-layered & mixed cropping?
A Madhya Pradesh couple has demonstrated that answer to each of these questions is “yes”. Yagya datta Sharma and his wife Aradhana Sharma have switched over from the director of a school to farming two years ago. They adopted the multi-layered and mixed cropping at village Mogawan tehsil Kasarawad, district Khargone , in the Narmada valley.
It is already a dense forest comprising medicinal plants, herbs, spices, millets, foodgrains, fruits, vegetables, flowers, sugar cane, decorative plants, teak, and so on.
 The Sharmas belong to a farmer family of Nimar region. Yagya datta's father has been the founder of a school complex of primary and secondary schools in Kasrawad district Khargone. Both Yagyadatta and wife Aradhana inherited the teaching activity all these years (2006-2020). Before joining his father's school Yagya Datt was area manager in a multinational pharmaceutical company in Chennai.
Two years ago, the Sharmas decided to go back to their roots and to return to the one-acre ancestral farm land that was lying unutilised all these years. Their only daughter, Shruti, had completed her graduation in Journalism and Mass Communication and PG in Photography is now working as a photographer in Mumbai.
Thus, the couple has no family responsibility and could adopt the concept of the vanaprasthashram without thinking the second time. After relinquishing their school responsibilities , the Sharmas could roam around places in India to learn about organic farming technique, understand crop pattern, collect seeds and plant grafts.
Teachings of farm experts like Mr Subhash Palekar taught them to raise their farm without using chemical fertilizers, insecticides and pesticides. During the last two years they have raised quality foodgrains, fruits, and flowers that had pleasantly surprised people around.
Their endeavor is to adopt the model of national mission of Atmanirbhar Kisan, Atmanirbhar Bharat (self-reliant farmer, self-reliant India).
Normally working people during their mid-fifties plan for their retirement, think about the pensioner’s life, buy medi-claim policies, worry about medicines for senior citizens, or at best, travel around the world for holidaying.
 However for the Sharmas the vanaprasthashram is a joyous new life, to learn new things from others and share their farming experiences to those who wish to learn.
Their dense forest boasts of yields such as local variety of mangoes, chickoo, lemons, sitaphal, ramphal, anar, guava, variety of chillies. onion, garlic, all-spice tamalpatra, mosambi, gourd, drumstick, papaya, tomato, amala, behada, merry gold, methi, kali mirch, rose, mogra jai, jui and countless other varieties of flowers and vegetables.
The only manure they use is gomutra and gomaya (urine and cowdang) of deshi cows. In return, they grow healthy vishamukta (poisonless) foodgrains to eat. The family is self-reliant as far as their eatables are concerned.
 One might hazard a guess that this couple’s farm is adaptation of Japan's Miyawaky forest concept that is raised on a small area of land.
Sharmaji says “it is not.” He has not followed the Japanese concept. He has evolved the concept of Rishi kheti, and has used his own method of cropping. The village does not face shortage of water for irrigation during several months of the year. It is because of nearby Veda, Narmada’s tributary. Sharmaji has skillfully laid a drip irrigation system throughout the farm. Net result is a yield of crops the family had not planned in their dreams at this stage of their life. The couple has successfully planned the landscaping in a way that spreads the fragrance of the plantation in all corners of the land.
The Sharmas spend their time with the teachers and students of nearby Nimad Abhyudaya Rural Management And Development Association (NARMADA) in the vicinity. They can share their experiences with them and in return offer them their cultural and academic inputs of the past.
Does your vanaprasthashram provide you monetary returns? Can you tell us if there is a cost benefit ratio?
Sharmas say they have not thought about these things. “We don't have commercial mindset. We have been leading a life full of satisfaction and joy . We are in our fiftees, have not attained even the retirement age of sixties, We learn news things of traditional farming, offer our experiences to those who wish to learn. Our farming is only two year old. Our total focus is on 'पहला सुख निरोगी काया'.We will think of the cost benefits later . Money is a by-product, it will automatically come. Where is the hurry?” --
Footnote: Vānaprastha (Sanskrit: वानप्रस्थ) literally meaning "way of the forest" or "forest road", is the third stage in the varnasrama system of Hinduism. It represents the third of the four ashramas (stages) of human life, the other three being Brahmacharya (bachelor student, 1st stage), Grihastha (married householder, 2nd stage) and Sannyasa (renunciation ascetic, 4th stage). ..
Location of village Mogawan tehsil Kasarawad, district Khargone, Madhya Pradesh in the Narmada valley,
location from better known places
from: Indore - 90 km
Maheshwar - 20 km
Omkareshwar - 70 km

Author
Prof Dr Kiran Thakur
Email address: drkiranthakur@gmail.com
Flat No. 3, Indrayani, Patrakarnagar, Pune 411016 Maharashtra --


एक युगल का वानप्रस्थाश्रम।
 क्या गृहस्थाश्रम की जिम्मेदारियों को छोड़कर एक हिंदू जोड़े के लिए वानप्रस्थाश्रम में प्रवेश करना, जैविक खेती/प्राकृतिक खेती करना और बहुस्तरीय और मिश्रित फसल को सफलतापूर्वक अपनाना संभव है?
मध्य प्रदेश के एक जोड़े ने इन सब बातों को अपने जीवन में अपनाकर यह साबित किया है और इन सारे प्रश्नों का उत्तर "हां" है ।
श्री यज्ञदत्त शर्मा और उनकी पत्नी श्रीमती आराधना शर्मा ने दो साल पहले एक स्कूल के निदेशक पद को छोड़कर खेती की ओर रुख किया।
उन्होंने नर्मदा घाटी में ग्राम मोगावाँ, तहसील कसरावद, जिला खरगोन में बहुस्तरीय और मिश्रित खेती को अपनाया। इनके द्वारा अपने खेत में औषधीय पौधे, जड़ी-बूटियाँ, मसाले, बाजरा, खाद्यान्न, फल, सब्जियाँ, फूल, गन्ना, सजावटी पौधे, सागौन आदि कई प्रकार के पौधों और फ़सलों को शामिल किया हैं ,जो सम्पूर्ण निमाड़ क्षेत्र में रासायनिक आधारित खेती के इस व्यावसायिक दौर में अनुठा प्रयोग हैं ।
शर्मा निमाड़ क्षेत्र के एक किसान परिवार से ताल्लुक रखते हैं। यज्ञ दत्त के पिता कसरावद जिला खरगोन में एक हाई स्कूल स्कूल के संस्थापक रहे हैं। यज्ञदत्त और पत्नी आराधना दोनों को विगत वर्षों (2006-2020) में शिक्षण गतिविधि विरासत में मिली।
अपने पिता के स्कूल में शामिल होने से पहले यज्ञ दत्त चेन्नई में एक बहुराष्ट्रीय दवा कंपनी में एरिया मैनेजर थे। दो साल पहले, शर्मा ने अपनी जड़ों की ओर वापस लौटने का फैसला किया और एक एकड़ पुश्तैनी कृषि भूमि को इस प्रकार के प्रयोग हेतु चुना,
 जो कई वर्षों से अनुपयोगी पड़ी हुई थी।
 वानप्रस्थ आश्रम अपनाने के सवाल पर श्री शर्मा जी ने बताया कि उनकी इकलौती बेटी श्रुति ने पत्रकारिता और जनसंचार में स्नातक की पढ़ाई पूरी की थी और ऊटी के प्रतिष्ठित फोटोग्राफी कालेज से स्नातकोत्तर करने के बाद अब मुंबई में एक सफल फोटोग्राफर के रूप में काम कर रही है। इस प्रकार अब मुझ पर कोई पारिवारिक जिम्मेदारी नहीं है ।
साथ ही समाज और इस माटी से जो लिया हैं उसे वापस लौटाना हमारा कर्तव्य हैं । अतः समृद्ध किसान और स्वस्थ भारत की संकल्पना में अपना योगदान देने के लिए भी उक्त कार्य प्रारंभ किया है । इन दोनों कारणों से युगल ने अपने शेष जीवन के लिए वानप्रस्थ आश्रम चुना और आनंद से प्रकृति के सानिध्य में सुकूनभरा जीवन बिताकर तन मन धन से समाजसेवा के कार्य में लगे हैं ।
अपने स्कूल की जिम्मेदारियों को छोड़ने के बाद, शर्मा जैविक खेती तकनीक के बारे में जानने, फसल के पैटर्न को समझने, बीज और पौधों को इकट्ठा करने के लिए भारत में जगह-जगह घूमें। श्री सुभाष पालेकर जैसे कृषि विशेषज्ञों की शिक्षाओं ने उन्हें रासायनिक उर्वरक एवं कीटनाशक का उपयोग किए बिना अपने खेत को उगाना सिखाया।
पिछले दो वर्षों के दौरान उन्होंने गुणवत्ता वाले खाद्यान्न, फल ​​और फूल उगाए हैं जिन्होंने आसपास के लोगों को सुखद आश्चर्यचकित किया है। आम तौर पर कामकाजी लोग अपने पचास के दशक के मध्य में अपनी सेवानिवृत्ति के लिए योजना बनाते हैं, पेंशनभोगी के जीवन के बारे में सोचते हैं, मेडिक्लेम पॉलिसी खरीदते हैं, वरिष्ठ नागरिकों के लिए दवाओं की चिंता करते हैं, या सबसे अच्छा दुनिया भर में यात्रा करते हैं। हालाँकि शर्मा के लिए वानप्रस्थश्रम दूसरों से नई चीजें सीखने और सीखने की इच्छा रखने वालों के लिए अपने खेती के अनुभवों को साझा करने के लिए एक आनंदमय नया जीवन है।
उनका घना जंगल स्थानीय किस्म के आम, चीकू, नींबू, सीताफल, रामफल, अनार, अमरूद, विभिन्न प्रकार की मिर्च जैसी पैदावार का दावा करता है। हल्दी, प्याज, लहसुन, ऑल-स्पाइस तेजपान, मोसम्बी, लौकी गिलकी आदि, सहजन, पपीता, टमाटर, आंवला, बेहड़ा, सिंदूर, काली मिर्च, गुलाब, गेंदा, मोगरा, जूही, और अनगिनत अन्य किस्मों के फूल और सब्जियां।
उनका आदर्श वाक्य है "आत्मनिर्भर किसान, आत्मनिर्भर भारत"। वे केवल देसी गायों के गोमूत्र और गोबर का उपयोग करते हैं। बदले में, वे खाने के लिए स्वस्थ विषमुक्त (जहर रहित) खाद्यान्न उगाते हैं। श्री शर्मा ने खेती हेतु जापानी मियावाकी अवधारणा का पालन न करके ऋषि खेती की अवधारणा को विकसित किया है, और फसल की अपनी भारतीय वैदिक पद्धति का उपयोग किया है। नर्मदा की सहायक नदी वेदा पास में होने के कारण साल के अधिकांश महीनों में गांव को सिंचाई के लिए पानी की कमी का सामना नहीं करना पड़ता है । फिर भी जल के अपव्यय को रोकने के लिए शर्माजी ने बड़ी कुशलता से पूरे खेत में ड्रिप इरिगेशन सिस्टम बिछाया है।
आज इनकी मेहनत और लगन का शुद्ध परिणाम खेत की मिश्रित फसलों की जैविक उपज है जिसे इस परिवार ने अपने जीवन के इस पड़ाव पर कभी सपनों में भी नही सोचा था। दंपत्ति ने योजनाबद्ध तरीके से वृक्षारोपण किया है जिससे भूमि के सभी कोनों में वृक्षारोपण की सुगंध फैलती है।
शर्मा अपना समय पास के Nimad Abhyudaya Rural Management and Development Association (NARMADA) के शिक्षकों और छात्रों के साथ भी बिताते हैं । समय समय पर जैविक व मिश्रित खेती से संबंधित सेमिनारों में भी किसानो को जागरुक एवं प्रेरित करते हैं । और अतीत के अपने सांस्कृतिक और शैक्षणिक अनुभवों को साझा करते है ।
 जब शर्मा जी से पूछा कि -" क्या आपका वानप्रस्थ आश्रम आपको मौद्रिक लाभ प्रदान करता है? क्या आप हमें बता सकते हैं कि लागत लाभ अनुपात है या नहीं?"
इस पर शर्माजी का कहना है कि उन्होंने इन चीजों के बारे में नहीं सोचा है।
"हमारे पास व्यावसायिक मानसिकता नहीं है। हम संतुष्टि और आनंद से भरा जीवन जी रहे हैं। हम अभी अपने पचासवें दशक में ही है और साठ के दशक की सेवानिवृत्ति की आयु भी प्राप्त नहीं की है। हम पारंपरिक खेती की चीजें लगातार सीखते रहते हैं, जो सीखना चाहते हैं उन्हें क्रियान्वयन कर अपने अनुभव में बदलते हैं।
हमारी जैविक खेती केवल दो साल पुरानी है। हमारा पूरा ध्यान 'पहला सुख निरोगी काया' पर है। हम लागत लाभों के बारे में बाद में सोचेंगे। पैसा एक उप-उत्पाद है, यह अपने आप आएगा। जल्दी कहाँ है?” --
फुटनोट: वानप्रस्थ (संस्कृत: वनप्रस्थ) का शाब्दिक अर्थ है "वन गमन" या "जंगल की राह", हिंदू धर्म की वर्णाश्रम व्यवस्था में तीसरा चरण है। यह मानव जीवन के चार आश्रमों (चरणों) में से तीसरे का प्रतिनिधित्व करता है, अन्य तीन ब्रह्मचर्य (स्नातक छात्र, प्रथम चरण), गृहस्थ (विवाहित गृहस्थ, द्वितीय चरण) और संन्यास (त्याग सन्यासी, चौथा चरण) हैं। ..
जगह:
इंदौर - 90 कि.मी
महेश्वर - 20 कि.मी
ओंकारेश्वर - 70 कि.मी
..

प्रो डॉ किरण ठाकुर
drkiranthakur@gmail.com
फ्लैट नंबर 3, इंद्रायणी, पत्रकारनगर,
पुणे 411016 महाराष्ट्र ..

Comments

Popular posts from this blog

A trap to control pests affecting plants and humans

Akira Miyawaki Forest blooming at Battis Shirala