जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा मराठी -इंग्लिश शब्दकोश
जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा मराठी -इंग्लिश शब्दकोश बाजिंद किंवा सैराट या शब्दांचे अर्थ किती जणांना माहीत असतील? कुणास ठाऊक. या दोन शब्दांचा वापर मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन चॅनेल यांच्यामुळे अचानक सुरू झाला तेव्हा व्हाट्सअप वर खूप लोकांनी एकमेकांकडे विचारणा केली:या शब्दाचा अर्थ काय? आधुनिक मराठी इंग्रजी शब्दकोशात अर्थ सहज सापडेना. जणू कुणालाच या शब्दांचा नेमका अर्थ माहिती नाही असे चित्र निर्माण झाले. पण १८५७ मध्ये जेम्स थॉमस मोल्सवर्थ नावाच्या ब्रिटिश माणसाला हे आणि असे शब्द हजारो शब्द माहित होते. त्याचे आणि अर्थ सुद्धा माहित होते. हा माणूस इंग्लंडहुन भारतात आला तोपर्यंत त्याला मराठीचा एक शब्दही माहिती नव्हता. अशी भाषा आहे हे देखील त्याला माहीत नव्हतं. नोकरीचा भाग म्हणून ही आपली भाषा तो शिकला. सुमारे ६०,००० मराठी शब्द गोळा करून, त्याचे इंग्रजी अर्थ संकलित करून त्याने एका अद्भुत शब्दकोशाची निर्मिती केली. त्यात आता अलीकडे सापडलेल्या या दोन शब्दांचेच अर्थ नमुन्यासाठी घेऊ: 1) बाजिंदा bājindā) बाजिंदा bājindā a ( P) Clever, expert, adroit, ade...