जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांची १५१ वी पुण्यतिथी
मराठी-इंग्लिश शब्दकोशाचे संपादक जेम्स थॉमस मोल्सवर्थ फोटो किंवा छायाचित्र उपलब्ध नाही. पण त्यांच्या पूर्वजांच्या तैलचित्राच्या आधारावर मुंबई येथील टाइम्स ऑफ इंडिया चे सेवानिवृत्त वार्ताहर आणि आता जगविख्यात चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांनी काढलेलं कल्पना चित्र मराठी-इंग्लिश शब्दकोशाचे संपादक जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांची १५१ वी पुण्यतिथी आज १३ जुलै २०२२ रोजी. मराठी भाषेवर थोर उपकार करणाऱ्या या महान शब्दकोशकारांला आपण आपण श्रद्धांजली वाहिली पाहिजे या भावनेने गेल्यावर्षी याच दिवशी पुण्याच्या विश्वकर्मा विद्यापीठाच्या वतीने एक छोटी पुस्तिका आम्ही प्रकाशित केली होती, ही पुस्तिका http://vuccd.com/james-thomas-molesworth-marathi-english-dictionary-project/ या लिंक वर कोणालाही उपलब्ध आहे. शब्कोशाचे काम अजूनही चालू आहे. त्या विषयी आजच्या पुण्यतिथीला जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचे पुण्यस्मरण, वर्ष १८५७ मध्ये शिळा प्रेस वर केलेलं काम ऑफसेट प्रिंटिंग च्या माध्यमातून १९७५ मध्ये शुभदा सारस्वत प्रकाशनचे श्री शरद गोगटे यांनी चालू ठेवले. त्याच्याही सहा-सात आवृत्त्या निघाल्या...