सेंद्रिय शेतीची यशोगाथा
पुस्तक परिचय सेंद्रिय शेतीची यशोगाथा एका एकराची अभिनव ‘ज्ञानेश्वरी’ लेखिका: डॉ. चित्रलेखा पुरंदरे -- विश्वकर्मा पब्लिकेशन्सने प्रसिद्ध केले हे पुस्तक फक्त सेंद्रिय शेती करणाऱ्या किंवा करू इच्छिणाऱ्या वाचकांसाठी उपयुक्त असे नाही. तर या क्षेत्रामध्ये सुद्धा किती नव नव्या चांगल्या, प्रेरणादायी गोष्ठी -घडामोडी घडत असतात त्याचे दर्शन घडविणारे सर्वसाधारण वाचकांसाठी उपयुक्त आहे असे असे हे पुस्तक आहे. एका अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या ज्ञानेश्वर बोडके या मुलाने स्वतःच्या हिमतीवर आणि ताकतीवर एवढे यश मिळवले याची ही कहाणी आहे. पुण्यानजीक हिंजवडी या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या भव्य औद्योगिक केंद्राशेजारी चमत्कार करून दाखविला आहे. बोडकेवाडी या छोट्या खेड्यात त्यांनी आपल्या स्वतःच्या फक्त एक एकर शेतीवर कष्ट करत करत फक्त स्वतःचीच आणि कुटुंबाचीच प्रगती केली असे नाही, तर महाराष्ट्रातील शेतीमध्ये मोठे नवीन दिशा दाखवणारे काम केले आहे. केवळ एक एकर शेतीमध्ये रोज किमान एक ते दोन हजार रुपये आपण मिळू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. राज्यातील नव्या दमाच्या शेत...