Posts

Image
वानप्रस्थाश्रम  आजच्या काळात वानप्रस्थाश्रम ही संकल्पना अमलात आणणे शक्य आहे का? वयाच्या पन्नाशी मध्ये शेती नव्याने शिकणे, सेंद्रिय शेतीचा-निसर्ग शेतीचा मल्टी लेवल मल्टी क्रॉपिंग प्रयोग करणे, तो यशस्वी करून दाखवणे शक्य आहे का? या प्रश्नाची प्रश्नांची उत्तरे “हो” आहेत,  हे मध्य प्रदेश मधील नर्मदा खोऱ्यात एका खेड्यात सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्याने करून दाखवले आहे.  ही कथा आहे आडवाटेला असलेल्या खरगोन जिल्ह्याच्या मोगावा या गावच्या यज्ञ दत्त शर्मा आणि सौभाग्यवती आराधना शर्मा या दाम्पत्याची. नर्मदा मैया च्या खोऱ्यात त्यांचं हे मोगावा गाव नदीपात्रापासून जवळच आहे. नर्मदा प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कुटुंबांना नव्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले.  त्या क्षेत्रात लेपा पुनर्वास या नवीन गावाला लागून मोगावा हे गाव आहे. तसे हे कुटुंब मूळचे शेतकरीच. पण पिताजींनी निमाड परिसरात सुरू केलेल्या प्राथमिक/माध्यमिक शाळेचा विस्तार यांनी वाढवला. शेती मागे पडली. शर्माजींची पन्नाशी उलटली तेव्हा त्यांनी निवृत्ती घेऊन आपल्या गावच्या शेतीवर प्रयोग करायचे ठरवले. एकुलत्या एक कन्येच्या - श्रुतीच्या -- पत्रकार

गोविंदराव टेंबे रचित ‘जयदेव’ संगीतिकेचे अभिगायन

Image
15.1.2023 “जयदेव’ संगीतिका ही गोविंदराव टेंबे यांची एक अद्भुतरम्य कलाकृती आहे.” अशी ओळख या संगीतिकेची करून दिली आहे. काहीशा अविश्वासाने आपण हे निवेदन वाचू लागतो आणि संगीतिका  पाहू/ऐकू लागतो.. निदान माझे तरी तसे झाले होते. नाट्यगृहातून बाहेर पडल्या नंतर मात्र ती खरोखरच कशी केवळ अद्भुतरम्यच नाही तर अविस्मरणीय कलाकृती आहे, हे न कंटाळता ज्याला त्याला सांगू लागतो. माझे तसे झाले.  ही संगीतिका प्रथम १९५४ साली आकाशवाणीवर केवळ श्रव्य स्वरूपात सादर झाली. नंतर कोल्हापूर येथे १९६२ मध्ये तिचा नाट्यप्रयोग झाला. त्यानंतर १९७३ आणि १९७४ मध्ये नाट्यप्रयोग झाले. वर्ष १९७४ नंतर या कलाकृतीचा आविष्कार झाला नव्हता. आता एकदम २०२३ च्या जानेवारी सहा रोजी या  संगीतिकेचे सादरीकरण झाले.  ती नेटकेपणे सादर केल्या बद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र (गुरुकुल) व भीमसेन जोशी अध्यासनाचे आभार मानावे तेव्हडे थोडेच आहेत.   या १९७४ सालच्या प्रयोगात नायकाचे - जयदेवाचे-  काम करण्याऱ्या पंडित सुधीर पोटे यांना तर अद्भुतपणाचे श्रेय मुख्यत: आणि भरभरून दिले पाहिजे. त्यांना  हे स्वरनाट्य मुखोद्गत आहे – ते  त्

पालघर केळवा शिरगाव पर्यटनाचा आगळा अनुभव

Image
महाराष्ट्रातील पालघर हे अतिशय आकर्षक, रम्य,  सुरक्षित आणि कुटुंबातील सर्वांना आवडेल असं टुरिस्ट डेस्टिनेशन का आहे हे सांगण्यासाठी हे लिहीत आहेत. त्याला आधार आहे आमच्या नात्यातील सात अगदी घनिष्ट नात्यातील कुटुंबाचा गेल्या दिवाळीतील अनुभवाचा.  मुंबईपासून नव्वद किलोमीटर अंतरावर असलेले पालघर शहर, तहसील आणि जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. मुंबई या आंतरराष्ट्रीय -राष्ट्रीय विमानतळा पासून फक्त पंचावन्न किलोमीटर अंतरावर हे केंद्र आहे.  पश्चिम रेल्वे, बोटीने, लोकल ट्रेन, एसटी, कार  अशा सर्व साधनांनी सहज जाता येईल अशा अंतरावर हे वसलेले आहे.  याचा तपशील कोणत्याही राज्य शासकीय/ पर्यटन विकास केंद्र, टुरिस्ट एजंट कडे सहज बघता येईल.  या ब्लॉगपोस्ट चा उद्देश माझी निरीक्षणे आणि इतरांपेक्षा वेगळे अनुभव मुद्दाम नोंदविणे असा आहे.  पुणे, नाशिक, औरंगाबाद, आणि बत्तीस शिराळा (सांगली जिल्हा ) येथील सात  कुटुंबातील एकूण चाळीस सदस्य आमचे ज्येष्ठ आप्त सौ सुनंदा आणि श्री भिमसिंग भामरे यांच्या बंगल्यावर दिवाळी साजरी करण्यासाठी नियोजन करून गेलो होतो. वय वर्ष सात ते ८0 या वयोगटातील स्त्री पुरुष त्यांच्या विस्तारीत दोन म

पत्रकार मनोहर सप्रे याचे पुस्तक: होल्टा: आठव, अनुभव, अनुभुती

पुण्याच्या वसंतराव काणे यांच्या “संध्या” या सायं दैनिकात माझी पत्रकारिता १९६९-७० मध्ये सुरू झाली. तेथे मी फक्त  23  दिवस होतो. मालक वसंतराव यांच्याखेरीज विद्याताई नाडगौडा आणि सुधाकर खोचीकर ,  नंतर मालकांचे चिरंजीव अशोक काणे यांचा परिचय झाला. केव्हातरी मनोहर सप्रे यांची ओळख झाली. पुढे मी दैनिक सकाळ मधून यु एन आय या वृत्तसंस्थेत रुजू झालो. “संध्या” शी संपर्क जवळपास तुटला. केव्हा तरी पत्रकार परिषदेत मनोहर ची भेट व्हायची. पण जवळीक ,  दोस्ती असं काही घडलं नाही. का घडलं नाही ?  नाही सांगता यायचं.   आत्ता  2022  मध्ये त्याचं पुस्तक  आलं:  होल्टा:  आठव ,  अनुभव ,  अनुभुती.   होल्टा  हा शब्दही माहीत नव्हता ,  पण वाचायला घेतलं. वाचलं. तेव्हा मात्र आपण त्या च्या  याआधीच्या   किती चांगल्या साहित्याला मुकलो होतो याची जाणीव झाली. कोकणातून आलेला ,  माझ्यापेक्षा काही वर्षांनी छोटा असलेला ,  हा पत्रकार किती प्रांजळ होता याची कल्पना मला आत्ता आली.   बरोबरीच्या इतर मुलांसारखी कोणतीही महत्त्वाकांक्षा नसलेला ,  बातमीदार म्हणून इतर कोणाशी स्पर्धा करावी ,  आयुष्यात काही साध्य करावं ,  यासाठी धडपड करावी असं व

जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा मराठी -इंग्लिश शब्दकोश

  जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा मराठी -इंग्लिश शब्दकोश  बाजिंद किंवा सैराट या शब्दांचे अर्थ किती जणांना माहीत असतील? कुणास ठाऊक. या दोन शब्दांचा वापर  मराठी सिनेमा आणि टेलिव्हिजन चॅनेल यांच्यामुळे अचानक सुरू झाला तेव्हा व्हाट्सअप वर खूप लोकांनी एकमेकांकडे विचारणा केली:या शब्दाचा अर्थ काय? आधुनिक मराठी इंग्रजी शब्दकोशात अर्थ सहज सापडेना. जणू कुणालाच या शब्दांचा नेमका अर्थ माहिती नाही असे चित्र निर्माण झाले. पण १८५७ मध्ये  जेम्स थॉमस मोल्सवर्थ नावाच्या ब्रिटिश माणसाला हे आणि असे शब्द हजारो शब्द माहित होते. त्याचे आणि अर्थ सुद्धा माहित होते. हा माणूस इंग्लंडहुन  भारतात आला तोपर्यंत त्याला मराठीचा एक शब्दही माहिती नव्हता. अशी भाषा आहे हे देखील त्याला माहीत नव्हतं. नोकरीचा भाग म्हणून ही आपली भाषा तो शिकला.  सुमारे ६०,००० मराठी शब्द गोळा करून, त्याचे इंग्रजी अर्थ संकलित करून त्याने एका अद्भुत शब्दकोशाची निर्मिती केली.   त्यात आता अलीकडे सापडलेल्या या दोन शब्दांचेच अर्थ नमुन्यासाठी घेऊ: 1) बाजिंदा bājindā) बाजिंदा bājindā a ( P) Clever, expert, adroit, adept, smart, proficient in scampish or in